भाजपाच्या माध्यमातून बोडदे,खानयाळे व शिरंगेवासीयांना लसीकरणासाठी एसटी सेवा…

2

दोडामार्ग ता.०४: बोडदे,शिरंगे व खानयाळे या गावातील लोकांना लसीकरणासाठी जाणे शक्य व्हावे यासाठी दोडामार्ग भाजपाकडुन एसटीबसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली.यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी व बोंडदे सरपंच विनायक शेट्ये यांनी प्रयत्न केेले.

तालुक्यातील संबधित गावातील लोकांना लसीकरण करण्यासाठी आवश्यक वाहने नव्हती.त्यामुळे त्यांच्याकडुन प्रवास कसा करावा,असा प्रश्न विचारला जात होता.या पार्श्वभूमीवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्या सुनंदा धर्णे,भाजप तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,सरपंच विनायक शेटये,एसटी चालक राजा दळवी,कर्मचारी नंदकिशोर गावडे,कोतवाल रामचंद्र तोरस्कर,संजय गवस,ग्रामसेविका श्रीम.जगताप व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

3

4