तुळस वनक्षेत्रात स्वयंस्फूर्तीने व लोकसहभागातून झाडांचे बीजरोपण…

2

वेंगुर्ले,ता.०४:जगात अनेक डोंगर दऱ्या आहेत. त्यामधील वन्यप्राणी यांना भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्य स्वरूपात फळे उपलब्ध व्हावे त्या दृष्टिकोनातून गुरुवारी मौजे तुळस कक्ष क्र138 मध्ये उपवनसंरक्षक सावंतवाडी, वनक्षेत्रपाल कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ मठ कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्थानिक प्रजातीच्या बीयांचे रोपन करण्यात आले. तुळस वनक्षेत्रामध्ये आंबा, फणस, कोकम आदी फळ झाडांचे बीजरोपण केले. यावळी उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.नारनवर यांच्या संकल्पनेतून व वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मठ वन परिमंडळातील तुळस वनक्षेत्रामध्ये स्वंस्फुर्तीने व लोकसहभागातून वनक्षेत्रामध्ये झाडांचे बीजरोपण करण्यात आले. यावेळी वनपाल मठ श्री अण्णा चव्हाण, वनरक्षक मठ श्री विष्णू नरळे, वनरक्षक तुळस सावळा कांबळे, वनमजुर तुळस संतोष इब्राम पुरकर, शंकर पाडावे वनमजुर मठ व तुळस ग्रामस्थ उपस्थित होते.

1

4