सावंतवाडीतील पेडणेकर ज्वेलर्सवर कारवाई; पंधरा दिवसांसाठी दुकान सील…

2

मुख्याधिकारी आक्रमक ; गैर धंदेवाईकांसह नियम न पाळणा-यांवर कारवाईचा इशारा…

सावंतवाडी,ता.०४: लाॅकडाऊन काळात सोन्याची दुकाने उघडण्याची परवानगी नसताना शोरूम उघडणा-या सावंतवाडीतील पेडणेकर ज्वेलर्स यांच्यावर येथील पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे शोरूम १५ दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.ही कारवाई मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केली.दरम्यान अशाच प्रकारे शहरात अनाधिकारपणे दुकाने सुरू ठेवणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यात अवैद्य धंदे ,व्यवसायिक यावरही करडी नजर असेल, असा इशारा श्री. जावडेकर यांनी दिला आहे.
कोरोनाच्या काळात दुकाने उघडी ठेवू नये,असा नियम असताना संबंधित ज्वेलरने आपले शोरूम सुरू ठेवले होते.त्याबाबत तक्रार आल्यानंतर आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षितेसाठी आर टी पी सी आर टेस्ट करून घ्यावी नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री.जावडेकर यांनी केले आहे.

30

4