स्टेटमेंट न देता गावासाठी योगदान द्या…

2

शंकर नाईक ; मनसेच्या मंदार नाईक यांच्यावर केली टीका…

बांदा,ता.०४: चक्रीवादळामुळे आरोस गावातील बीएसएनएल टॉवरमध्ये विजेअभावी बिघाड झाला होता. परंतु थ्रीजी व लॅण्डलाईन सेवा बहुतांश सर्व ठिकाणी सुरू होती. कुणाचीही तक्रार नसताना ‘आरोस गावात बीएसएनएल सेवेचा बोजवारा’ अशी स्टेटमेंट देऊन काही नेतेमंडळीना काय सिद्ध करायचे आहे, असा सवाल आरोस सरपंच शंकर नाईक यांनी केला आहे. तसेच केवळ स्टेटमेंट न देता गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. नाईक यांनी केले.
‘आरोस गावात बीएसएनएल सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ग्राहक आपली बिले वेळेत भरतात परंतु त्यांना योग्य सेवा दिली जात नाही’ असे स्टेटमेंट मनसे विभागप्रमुख मंदार नाईक यांनी दिले होते. त्यावर सरपंच शंकर नाईक म्हणाले की, बीएसएनएलची थ्रीजी व लँडलाइन सेवा सुरळीत सुरू होती. टुजी सेवा काही प्रमाणात विस्कळीत होती परंतु सद्यस्थितीत ती सुरळीत करण्यात आली आहे. कुणाचीही तक्रार नसताना केवळ प्रसिध्दीसाठी स्टेटमेंट करू नका. गावात किती लँडलाईन सुरू किंवा बंद आहेत त्याची अगोदर माहिती घ्या तसेच गावाच्या विकासासाठी काय योगदान दिले, असा सवाल शंकर नाईक यांनी मनसेचे मंदार नाईक यांना केला आहे.
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे गावातील टॉवर वीज विजेअभावी बंद होता. वीज कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने रानावनात पडलेले वीज खांब उभे केले व चार दिवसांनी गावात वीज आणली. गावाच्या विकासासाठी न झटता केवळ प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट करणारे गावावर आलेल्या कठीण प्रसंगात कुठे होते, असा सवालही शंकर नाईक यांनी केला.

1

4