रूग्णांची संख्या घटतेय, लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनमध्ये येईल…

2

पालकमंत्री उदय सामंताचा विश्वास ; केंद्रीय समितीने सुद्धा जिल्ह्यासाठी भरीव निधी द्यावा…

सावंतवाडी ता.०४: सिंधुदुर्गात दिवसेंदिवस कोरोनाची घटणारी आकडेवारी दिलासादायक आहे.त्यामुळे लवकरच जिल्हा ग्रीन झोन मध्ये येईल,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केला.दरम्यान पंचनामे झाले, तरी उशिरा का होईना केंद्रीय समितीचे पथक नुकसानीची पहाणी करण्यासाठी सिंधुदुर्गात येत आहे.त्यांचे आपण आभार मानतो, मात्र त्यांनी सुद्धा येथील नुकसंग्रस्तांना भरीव निधी उपलब्ध करून द्यावा,असेही ते यावेळी म्हणाले.श्री.सामंत यांनी झूम ॲपच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते .श्री.सामंत पुढे म्हणाले,कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस घटत आहे. सद्यस्थितीत तो २२.२ वरून ९.८ वर आला आहे.त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे.हा आकडा असाच कमी होत गेल्यास लवकरच जिल्हा ग्रीन झोन मध्ये येईल.

चक्रीवादळाच्या नुकसानीबाबत बोलताना श्री.सामंत म्हणाले,सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान नुकसान ग्रस्तांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आला आहे.येत्या दोन-तीन दिवसात तो वितरीत होईल. दरम्यान याच पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीचे पथक नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या ठिकाणच्या नुकसानग्रस्तांनी कोणाची वाट न बघता झालेल्या मोड-तोडीची दुरुस्ती करून घेतली आहे.त्यामुळे त्यांना पंचनामे करण्यास अडथळे येतील, मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही पंचनाम्याचे अहवाल त्यांना देऊ आणि नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यास सहाय्य करू, असेही ते म्हणाले.

1

4