गाडी पार्कींगच्या वादातून सावंतवाडीत उपनगराध्यक्षांच्या पतीला मारहाण…

2

दोघा युवकांवर गुन्हा दाखल; विरोधात तक्रार घेतली नसल्याचे विरोधकांचे म्हणणे…

सावंतवाडी,ता.०४: येथिल पालिकेच्या भोसले उद्यानासमोरील पार्किंगच्या जागेत गाड्या पार्क केल्याच्या कारणावरुन येथिल उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर यांचे पती प्रसाद कोरगावकर यांच्यासह मुलगा अखिलेश याला मारहाण करण्यात आली.ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येथिल उद्यानाच्या बाजूला असलेल्या श्री. कोरगावकर यांच्या घरासमोर घडली. दरम्यान या प्रकरणी कोरगावकर यांची मुलगी कुमारी ऐश्वर्या हीने दिलेल्या तक्रारीनुसार गौरेश कामत आणी अतिक सामंत यांच्यासह अन्य चार ते पाच जणांवर येथिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आपण त्या ठीकाणी चुकीच्या पध्दतीने पार्कींग केले जात आहे,याची विचारणा करण्यासाठी गेलो होतो, यावेळी आपल्याला प्रसाद कोरगावकर यांनी मारहाण केल्याने पुढील प्रकार घडला.
मात्र याबाबत पोलिसांनी आपली विरुध्द तक्रार नोंदवून घेतली नाही.त्यामुळे आपण पोलिस अधिक्षकांकडे दाद मागणार आहे,असे कामत यांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की,येथिल पालिकेच्या उद्यानसमोरील जागेत उपनगराध्यक्ष कोरगावकर यांचे पती आपल्या गाड्या पार्क करतात या गाड्या चूकीच्या पध्दतीने त्या ठीकाणी लावल्या गेल्या आहेत.असे कामत यांना वाटले त्यामुळे त्यांनी त्या ठीकाणी असलेल्या वॉचमनला विचारणा केली.यावेळी त्या वॉचमनने आपल्याला काही माहीत नाही असे सांगितले.

यावेळी संबधित वॉचमनने तुमच्या गाड्या कोणतरी फोडण्यासाठी आले आहे,असे सांगितले.यावेळी आपण त्या ठीकाणी गेलो असता त्या ठीकाणी गौरेश व त्याचा सहकारी होता. त्याने आपल्याला गाड्या बाबत विचारणा केली.तसेच आपण या गाड्या फोडून टाकणार आहे,असे सांगितले. आणि त्यानंतर आपण घरी आल्यानतर तो आपल्या काही मित्रासमवेत घरी आला. आणि आमच्या दुकानात घुसून आपल्या वडीलांसह,भाऊ अखिलेश याला मारहाण केली. असे तीने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गौरेश कामत,अतिक सामंत,यांच्यासह अन्य चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार श्री देसाई यांनी दिली.

19

4