वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या विलगिकरण कक्षाचे उदघाटन…

2

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून समाजकल्याण विभागाची जागा उपलब्ध…

मालवण, ता. ०४ : कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झालेल्या समाजकल्याण विभागाच्या जागेत वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने संस्थात्मक विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आज जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, कृषी अधिकारी संजय गोसावी, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण, तलाठी श्री. राठोड, उपसरपंच विरेश नाईक, गृहपाल कुणाल इंदुलकर, श्री. परब, श्री. सावंत, पोलिस पाटील पांडुरंग चव्हाण, माजी उपसरपंच ललित वराडकर, प्रसाद चव्हाण, गणेश परब, वायरी भुतनाथ ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कक्षामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत मिळणार आहे.

2

4