विलगीकरण कक्ष उभारून मृत्युदर आणि पॉझिटिव्ह रुग्ण संख्या कमी होणार का…?

2

रविंद्र मडगावकरांचा पंचायत समिती बैठकीत सवाल; १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करा…

सावंतवाडी ता.०४: तालुक्यात ठिक-ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारून मृत्युदर आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होणार का?,असा सवाल करत रुग्णांचे जीव वाचण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड उपलब्ध करा,अशी मागणी पंचायत समिती माजी सभापती रविंद्र मडगावकर यांनी आज आरोग्य विभागाकडे केली.दरम्यान शिरशिंगे-शिवापुर रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली,आमदार दीपक केसरकर मंत्री असताना मंत्रालयात बैठका झाल्या व रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली.मात्र त्यानंतर पुढील काहीच प्रक्रिया पार न पडल्याने हा रस्ता रखडला आहे.याला सर्वस्वी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत मानेच जबाबदार असून लवकरच या संदर्भात ग्रामस्थांना घेऊन बांधकाम कार्यालयात धडक देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. येथील पंचायत समितीची मासिक बैठक आज झूम ॲप द्वारे सभापती सौ.निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,
यावेळी उपसभापती शितल राऊळ, प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते.यावेळी विविध विकास कामावर चर्चा झाली. यामध्ये मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूर झालेली ॲम्बुलन्स अद्यापही मिळाली नाही याबाबत सदस्य संदीप मळेकर यांनी प्रश्न उपस्थित केला मात्र पासिंग चा विषय असल्याने हे ॲम्बुलन्स मिळाले नसल्याचे उत्तर तालुका आरोग्य अधिकारी कडून घेण्यात आले यावेळी एकीकडे त्यामुळे काम करत असताना आरटीओकडून झालेली दिरंगाई चुकीची असल्याचे सांगून लवकरात लवकर ॲम्बुलन्स रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित करून द्या असे सांगितले. शिवाय ग्रामीण भागामध्ये उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षातील लोकांना जेवण देण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत त्यासाठी बचत गटामार्फत त्यांना जेवण उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी श्री गावडे यांनी केली यावेळी सभापती सावंत यांनी ज्या ठिकाणी जास्त व्यक्ती विलगीकरणात आहे अशा ठिकाणी बचत गटामार्फत चव्हाण देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या डागडुजी बाबत काहीच हालचाली केले नाही त्यामुळे ग्रामीण भागात तसेच महत्वाच्या रस्त्याच्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे मळगाव घाटीत पावसाळ्याआधी रस्ता खचला आहे मात्र शासनाकडून निधीच येत नसल्याचे कारण उपअभियंता अनिल आवटी यांनी सांगून यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र रवींद्र मडगावकर यांनी शिरशिंगे शिवापूर रस्त्यावरून बांधकाम मला धारेवर धरले केवळ कार्यकारी अभियंता श्री माने यांच्या मुळेच या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले केल्याचा आरोपही त्यांनी केला निविदा प्रक्रिया होऊनही रस्ता होत नाही ही शोकांतिका असून याबाबत लवकरच बांधकाम मला धडक देऊन जाब विचारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सोनुर्ली येथे पाणलोट अंतर्गत उभारण्यात आलेले बंधारे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे फुटले त्याचे काय करणार याबाबत सदस्य बाबू सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला यावर तालुका कृषी अधिकारी यांनी सदर बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात येणार असून हे काम चक्रीवादळामुळे झालेल्या पावसात रखडले असल्याचे सांगितले मात्र सदस्य श्री सावंत यांनी बंधारे दुरुस्ती नको तर नव्याने बांधून मिळावे अन्यथा आपण याबाबत न्यायालयात दाद मागू असा इशारा दिला.

चौकट
त्या कोविड सेंटरचे ऑडिट करा..
सावंतवाडी शहरालगत उभारण्यात आलेल्या खाजगी कोवाड सेंटरमध्ये आदल्या दिवशी रात्री दाखल झालेला रुग्ण दुसऱ्या दिवशी मयत झाला मात्र संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून तब्बल तीन दिवसाचे ३२ हजार ५०० रुपयांचे बिल घेण्यात आले हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी सदस्य मेघश्याम काजरेकर यांनी केली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी शिरोडकर यांनी याबाबत आपल्याकडे तक्रार द्या असे सांगितले तर प्रभारी गटविकास अधिकारी यांनी या सेंटरचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.

6

4