उपनगराध्यक्षांच्या घरात घुसुन हल्ला करण्याची हीम्मत होतेच कशी…?

2

बबन साळगावकर; गुंडांनी नवीन पोलिस निरिक्षकांना दिलेली ही सलामी समजावी का…?

*सावतवाडी ता.०४:* उपनगराध्यक्षासारख्या पदाधिकार्‍यांच्या घरात घुसून हल्ला करण्याची हीम्मत होतेच कशी,असा सवाल करत उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर यांच्यावर हल्ला करणार्‍या प्रवृत्तीचा आपण तीव्र शब्दात निषेध करतो,अशी भूमिका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी माडली.दरम्यान सावंतवाडीत सत्तांतर झाल्यानंतर अशा प्रकारचे निंदयनिंय प्रकार वाढीस लागले आहेत.नव्याने आलेल्या सावंतवाडी पोलिस निरिक्षकांना गुंडांनी दिलेली ही सलामी समजावी का?,असा ही प्रश्न श्री.साळगावकर यांनी उपस्थित केला.
कोरगावकर यांच्या कुंटूंबावर झालेला हल्ल्यानंतर श्री.साळगावकर यांनी आज त्यांच्या घरी जावून कुंटूबियांची भेट घेतली.यावेळी सुरेश भोगटे,अभय पंडीत आदी उपस्थित होते.त्यांनतर त्यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की ,कोरगावकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करतो. ही संस्कृती सावंतवाडी सारख्या शांत आणि संयमी शहराला शोभणारी नाही.शांतताप्रिय शहरात सात आठ जणांचे टोळके येवून हल्ला करतत् हे पोलिसांचे अपयश समजायचे का ?,असा सवाल करुन या प्रवृत्तीची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेवून या प्रवृतीचा बिमोेड करावा, अशी ही मागणी त्यांंनी केली आहे.

12

4