_वैभववाडी तालुका पुन्हा कोरोनामुक्त करुया:-आमदार नितेश राणे_

2

वैभववाडी

कोव्हिड सेंटरमध्ये मुक्तपणे नातेवाईकांना फिरण्यास देशात कुठेही परवानगी नाही. मात्र आपल्या जिल्ह्यात सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये नातेवाईक बिनधास्त फिरत आहेत. हे फार चुकीचे आहे. शिस्तीचा अभाव हे एक रुग्ण वाढीचे प्रमुख कारण आहे. तर दुसरे कारण रुग्णवाहिका वेळेत न पोचणे हे आहे. या महामारीत लढताना शिस्तही लावावीच लागेल. यापूर्वी आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून तालुका कोरोनामुक्त झाला होता. दुसऱ्या लाटेतही कोरोना रोखण्यासाठी गावातील सरपंच व संनियंत्रण समिती जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यात कोणतीही शंका नाही. गावात काम करत असताना माझ्याकडून अजून काही सहकार्य हवे ते सांगा. या लढ्यात तुम्ही एकटे आहात असे अजिबात समजू नका. मी तुमच्या सोबत आहे. पुन्हा एकदा तालुका कोरोनामुक्त करूया. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी तालुक्यातील सरपंच यांच्याशी संवाद साधला. या बैठकीला सर्वपक्षीय सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात काम करत असताना सरपंच यांना येणाऱ्या अडचणी आ. नितेश राणे यांनी जाणून घेतल्या. ही बैठक पंचायत समिती सभागृहात पार पडली. या बैठकीला उपसभापती अरविंद रावराणे, जि. प. सदस्य शारदा कांबळे, तालुका अध्यक्ष भाजपा नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, पं.स. सदस्य हर्षदा हरयाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, प्रकाश पाटील, रितेश सुतार, रोहन रावराणे, संताजी रावराणे, सरपंच एस. एम. बोबडे, उज्वल नारकर, सुवर्णा लोकम, रुपेश रावराणे, आर. बी. जाधव, भीमराव भोसले, बाजीराव मोरे व इतर सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सरपंच यांनी विविध सूचना मांडल्या. कार्डिअँक रुग्णवाहिका द्या. अशी मागणी उंबर्डे सरपंच बोबडे यांनी केली, वैद्यकीय अधिकारी यांनी विलगीकरणाला भेट द्यावी अशी मागणी प्रकाश पाटील यांनी केली, रुग्णवाहिकेचे चालक उर्मट भाषेत वक्तव्य करत असल्याची तक्रार लोरे सरपंच घनश्याम नावळे यांनी केली, घाटात पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी भालचंद्र साठे यांनी केली, मुबलक सॅनिटायझर द्या अशी मागणी भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांनी केली, गावातील कंटेनमेंट झोन नावापुरते असल्याची तक्रार अरुळे सरपंच उज्वल नारकर यांनी केली. भीती राहावी यासाठी आरोग्याने जनजागृती करावी अशी मागणी भीमराव भोसले यांनी केली.
नितेश राणे म्हणाले, गावातील विलगीकरण कक्षात जाणाऱ्या नातेवाईकांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. ग्रामपंचायतीना मुबलक सँनिटायझर उपलब्ध करून दिले जाईल, अजून एक रुग्णवाहिका तालुक्यात दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
भुईबावडा घाटाकडे चोरवाट म्हणून पाहिले जात आहे. करुळ नाक्यावरील तपासणीचा ससेमिरा चुकविण्यासाठी बरेच जिल्ह्यात प्रवेश करणारे या मार्गाने येत आहेत. त्यामुळे भुईबावडा, रिंगेवाडीत रुग्ण वाढत आहेत. हा मार्ग बंद करा किंवा पोलिस बंदोबस्त लावा अशी मागणी भालचंद्र साठे यांनी केली. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी तात्काळ जिल्हा अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला. व भुईबावडा घाटात उपाययोजना करा. अशा सूचना जिल्हा अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिल्या. लवकरच या घाटात पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल अशी ग्वाही श्री. दाभाडे यांनी आ. नितेश राणे यांना दिली आहे.
जाचक अटीमुळे १५ वा वित्त आयोग निधी मिळण्याची आशा कमी आहे. मागील वर्षाप्रमाणे निधी खर्च करण्याच्या सूचना जी.प.ला केल्या जातील. १०८ रुग्णवाहिका जिल्ह्याबाहेर नेण्यास परवानगी दिली जाईल. लोरे येथे उद्यापासून लसीकरण केंद्र सुरू होईल असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे.

3

4