“तो” मारहाणीचा प्रकार गैरसमजातून,नगराध्यक्षांची बदनामी नको…

2

निशांत तोरसकरांचा रुपेश राऊळांना सल्ला; ती जागा खासगी पार्कींगसाठी बंद करण्याची मागणी…

सावंतवाडी,ता.०५:
शहरात घडलेला कालचा मारामारीचा प्रकार हा निव्वळ गैरसमजातून होता.त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राउळ यांनी त्यात नाहक राजकारण आणून नगराध्यक्ष संजू परब यांना बदनाम करू नये,असा सल्ला भाजपाचे युवा कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी दिला आहे.दरम्यान उदयानासमोरील पार्कीग हा नगरपरिषद आणि प्रशासनाच्या अखत्यारीतला विषय आहे.त्या जागेत पालिका प्रशासनाकडुन खासगी पार्कींग बंद करावे,आणि तसा बोर्ड लावण्यात यावा,असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,श्री.राऊळ यांनी सावंतवाडीत घडलेल्या मारहाण प्रकरणाचे नाहक राजकारण करून किंवा मोठी नावे घेऊन शहरातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नये.झालेला हा प्रसंग निव्वळ गैरसमजातून झालेला प्रकार होता.यात कोणताही राजकिय हेतू अथवा गुंडगिरी पसरविण्याचा उद्देश नव्हता.यात सहभागी असलेले दोन्ही व्यक्ती या शहरातील प्रतिथयश व्यावसायिक कुटुंबातील आहेत.हा विषय शिव उद्याना समोरील जागेत पार्किंग करण्यावरून झाला. त्या बोलचालीचे रूपांतर वादवादीत होऊन हाणामारीत झाले.या मागे कोणतेही पूर्वनियोजित कारण नव्हते.उद्यानासमोरील पार्किंग हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय असून भविष्यात असे प्रसंग घडू नये,म्हणून माझी माननीय मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की,त्या जागेत खाजगी पार्किंग त्वरित बंद करून बाहेरील बाजूस गेट लावण्यात यावे.दरम्यान श्री.राऊळ यांनी नाहक या वादा मध्ये नगराध्यक्ष संजू परब यांना गुंतवून उगाचच शहरातील वातावरण खराब करू नये. प्रसंग घडला त्या वेळी स्वतः नगराध्यक्ष जातिनिशी तिथे पोचून वेळीच मध्यस्थी करून हे प्रकरण पुढच्या थराला जाणार नाही, याची काळजी घेतली.

1

4