कलमठ गावात ४० बेडचा ग्रामविलगिकरण स्थापन…

2

तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन…

कणकवली, ता.५ : कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने ४० बेडचा ग्रामविलीगीकरण उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन आज तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी ड़ॉ.संजय पोळ, जि.प. सदस्या स्वरूपा विखाळे, पं.स. सदस्य महेश लाड़, मिलिंद मेस्त्री, सरपंच वैदेही गुडेकर आदी उपस्थित होते.
कलमठ गावातील कोविडबाधित मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांना या ग्रामविलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे. यावेळी ग्रा.पं सदस्य संदिप मेस्त्री, मंडळ अधिकारी नागावकर, ग्रा.पं सदस्य स्वप्निल चिंदरकर, राजू राठोड, विनायक मेस्त्री, सचिन बांदिवडेकर, सायली पवार, श्रद्धा कदम, हेलन कांबळे, ग्रामविकास अधिकारी विश्वास पावसकर, केंद्र प्रमुख शुभांगी दळवी, उपमुख्याध्यापिका मीनल खानोलकर, तलाठी श्रध्दा कोरगावकर, आरोग्य सेवक चंद्रमणी कदम, पोलिस पाटिल संतोष जाधव, शमिता बिरमुळे, श्री लिमये, विलास गुडेकर,जीतू कांबळे, निसार शेख,परेश कांबळी उपस्थित होते.

1

4