सर्जेकोटात आढळले खवले मांजर…

2

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल…

मालवण, ता. ०५ : सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली हर्ष पराडकर, ओंकार आचरेकर, नील आचरेकर या शाळकरी मुलांना जाळ्यात खवले मांजर अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ गावातील प्राणीमित्र राजन आचरेकर याच्या घरी धाव घेत याची माहिती दिली. त्यानुसार वनविभागाशी संपर्क साधून याची माहिती देण्यात आली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाखाली नेहमीप्रमाणे हर्ष पराडकर, ओंकार आचरेकर, निल आचरेकर ही लहान मुले खेळत होती. यावेळी त्यांना जाळ्यात खवले मांजर अडकल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती प्राणीमित्र राजन आचरेकर यांना सांगितले. त्यांनी याची माहिती वनविभागास दिली. त्यानुसार दुपारी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी गोरज आचरेकर, राजेश पराडकर ,सुदेश रेवंडकर, जय लाड, स्नेहल आचरेकर, तन्वी पराडकर, किर्ती आचरेकर, भारती आडकर,वनपाल श्रीकृष्ण परीट,
वनरक्षक सारीक फकीर आदी उपस्थित होते. जाळ्यात अडकलेले खवले मांजर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

12

4