बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा खून…

2

अंगावर जखमा; नागरीकांचा संशय,पोलिसांकडुन तपास सुरू…

बांदा,ता.०५: येथिल गडगेवाडी परिसरात राहणार्‍या एका परप्रांतिय कामगाराचा मृतदेह घरात आढळून आला आहे.त्याच्या अंगावर चाकू सारख्या हत्याराने वार झालेले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्यामुळे त्याचा खून झाला असावा,अशी शक्यता नागरीकांनी व्यक्त केली आहे.विश्वजित कालिपत मंडल रा. बांदा,मुळ रा. पश्चिम बंगाल असे त्याचे नाव आहे. तो आपल्या कुंटूबासमवेत त्या ठीकाणी राहत होता.घटनेची माहीती मिळाल्यानंतर त्या ठीकाणी बांदा पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू करण्यात आला आहे.मात्र घटना घडल्यानंतर खोेली आतून बंद असल्यामुळे नेमका प्रकार काय बाबत पोलिस सुध्दा चक्रावले आहेत.

दोन्ही मुले आज सकाळी जोरजोराने आपल्या वडिलांना हाक मारत होती. हे ऐकून मकरंद तोरसकर यांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे तोरसकर यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विश्वजित खाली कोसळलेला निदर्शनास आला. यावेळी पत्नी व मुले दुसर्‍या खोलीत होती. त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी होती.
विश्वजित याच्या छातीवर खोल जखमा आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञाताने त्याच्यावर खूनी हल्ला केल्याची शक्यता आहे. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे सहकारी कर्मचारी समीर भोसले, अमोल बंडगर, संजय हुंबे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर हळदे, राजाराम कापसे, होमगार्ड विश्वजित भोगटे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. सावंतवाडी पोलीस उप अधीक्षक रोहिणी साेळंखे याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा पोलीसांचे श्वानपथकही घटनास्थळी आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील काही वेळेतच घटनास्थळी येत आहेत.
मयताच्या शरीरावरील जखमा पाहता विश्वजित याचा घातपात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. ोलीस तपासात अद्यापपर्यंत कोणतेही धारदार शस्त्र सापडलेले नाही पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करीत अाहेत. बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर घटनास्थळी उपस्थित होते. बांदा पोलीसात या घटनेची अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. सदर घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

15

4