कणकवली पटवर्धन चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी ; दुपारपर्यंत ६६ जणांची रॅपिड टेस्ट

2

कणकवली, ता.५ : सकाळी ११ वाजल्यानंतरही अनेक नागरिक शहरात फिरत असल्याचे दिसून आले. त्या सर्वांची कणकवली पोलीस पथकाने कसून चौकशी केली. तर दुपारपर्यंत ६६ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव असला तरीही कणकवली शहर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्यांची चौकशी सुरू ठेवली आहे.
या पोलीस पथकात सिताराम सावंत,सहाय्यक पोलीस प्रमोद सुर्वे, महिला पोलीस निलम पवार, दिपाली पाटील, स्मिता माने, पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने, वाहतूक पोलीस संदेश आबिटकर नगरपंचायत कर्मचारी रवि महाडेश्वर, होमगार्ड प्रशांत वळंजु आदी सहभागी आहेत.

26

4