मडूरे आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

2

बांदा,ता.०५: मडूरे येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ सरपंच सौ.साक्षी तोरसकर यांच्या हस्ते करण्यात आला. कोविड समितीच्या वतीने गावातील ६० वर्षांवरील नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.एकूण ११० जणांना लस देण्यात आली.
यावेळी उपसरपंच विजय वालावलकर, ग्रा. पं. सदस्य सखाराम परब, पोलीस पाटील नितीन नाईक, समिती सदस्य यशवंत माधव, विनोद वालावलकर, प्रविण परब, घनश्याम वालावलकर, मंदार वालावलकर, ओंकार वालावलकर, संकेश मडूरकर, अनिशा वेंगुर्लेकर, अनिष्का वेंगुर्लेकर, दिनेश नाईक, आनंद परब, अरुण परब, सिद्धेश सावळ, डॉ. ऋतिका माजगावकर, आरोग्य सहाय्यक श्रीमती रणसुर, रेश्मा परब, शीतल परब, सुनंदा केरकर, डॉ. विकास बर्वे, विद्या वालावलकर, श्रीकृष्ण भोगले आदी उपस्थित होते.
सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे व बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली. केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी प्रभागवार नागरिकांच्या वेळेत केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्यासमवेत तलाठी व्ही. एस. कविटकर, कोतवाल नाना वेंगुर्लेकर, विनोद धुरी उपस्थित होते. यावेळी मंदार वालावलकर कुटुंबियांकडून अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.

4

4