उपवनसंरक्षकांच्या संकल्पनेतून तांबुळी येथील वनक्षेत्रात वृक्ष लागवड…

2

सावंतवाडी,ता.०५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडीचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या संकल्पनेतून तांबोळी येथे वृक्ष लागवड व विविध फळझाडांची बी पेरणी करण्यात आली.दरम्यान जून महिन्यात तांबुळी येथील वनक्षेत्रात विविध फळझाडांच्या १०० किलो बिया लागवड करण्यात येणार आहे.
या प्रसंगी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे,तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, महिला बचत गटाच्या सदस्यां,वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थिती मध्ये दुर्मिळ झाडाचे बीजरोपण करून कार्यक्रम घेण्यात आला.

11

4