भुईबावडा येथे पोलिस चेकनाका सुरू…

2

पो. नि. अतुल जाधव; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल…

वैभववाडी/पंकज मोरे,ता.०५: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस उद्रेक पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भुईबावडा रिंगेवाडी येथे पोलिस चेकनाका कार्यान्वित करण्यात आला आहे. याठिकाणी २ पोलिस अमंलदार, २ होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करून ‘इ पास’ ची खात्री करून व्यक्तींना सोडण्यात येणार असल्याची माहिती वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
भुईबावडा घाटाकडे चोरवाट म्हणून पाहिले जात आहे. करुळ नाक्यावरील तपासणीचा ससेमिरा चुकविण्यासाठी बरेच जिल्ह्यात प्रवेश करणारे या मार्गाने येत आहेत. भुईबावडा रिंगेवाडी मध्ये रुग्ण वाढत आहेत. अखेर प्रशासनाने भुईबावडा रिंगेवाडी येथे पोलिस चेक नाका कार्यान्वित केला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना चपराक बसणार आहे.
तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांची रॕपीड टेस्ट केली जाणार आहे. यात पॉझिटीव्ह आढळल्यास त्याला सांगुळवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करुन इ पासची खात्री करून व्यक्तींना सोडण्यात येईल. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वैभववाडी पो. नि. अतुल जाधव यांनी दिली.

2

4