काँग्रेसच्या वतीने आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भोजन वाटप…

2

सावंतवाडी ता.०५: राष्ट्रीय कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज पासून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉंग्रेस थाळी सुरू करण्यात आली आहे.तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर कॉंग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.दरम्यान जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते भोजनाच्या कंटेनरचे वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तालुका उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे, समीर वंजारी, तालुका कार्यकारणी सदस्य मोहसिन मुल्ला आदी कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

1

4