वेंगुर्ल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा…

2

तालुका काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांना काजू व नारळ रोपे तसेच खताचे वाटप

वेंगुर्ले,ता.०५:
तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेतकऱ्यांना काजू व नारळ रोपे तसेच खते वाटप करून हा शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
लोकनेते नाना पटोले यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. शेती व शेतकऱ्यांप्रती तळमळीने काम करणाऱ्या नानांचा आज *5* जून रोजी वाढदिवस. हा दिवस शेतकरी सन्मान दिवस म्हणून साजरा करण्याचे वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे ठरविण्यात आले होते, त्याप्रमाणे आज शेतकऱ्यांना काजू व नारळ रोपे तसेच खते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष श्री विधाता सावंत, ओ. बी.सी. सेल चे जिल्हाध्यक्ष श्री जगन्नाथ डोंगरे, शहर अध्यक्ष गटनेते श्री प्रकाश डीचोलकर, महिला शहर अध्यक्ष नगरसेविका सौ कृतिका कुबल, नगरसेवक श्री आत्माराम सोकटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

2

4