नाना पटोलेंच्या वाढदिवसा निमित्त माणगावात वृक्षारोपण…

2

कुडाळ ता. ५: नाना पटोलेंच्या वाढदिवसा निमित्त येथील तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माणगाव मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वन विभाग माणगावचे परी मडंल अधिकारी सुनील सावंत, वन अधिकारी सुनील भंडारे, तसेच बाळराजे जगताप कालेली, यांच्या वतीने परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच वृक्ष वाटप करण्यात आले. या मध्ये सुपारी, काजु, आंबा, फणस, व फुलझाडे वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाचे वाटप करण्यात आले.
या वेळी महिला बचत गट अध्यक्ष स्मिता कुंभार, गोविंद कुंभार, कडव, सुदर्शन कुभांर , बचत गट महिला उपस्थित होते.

5

4