सावंतवाडी बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी गांधी चौक ते भवानी चौकातील गाड्या रोखा…

2

सुरेंद्र बांदेकर;.होम आयसोलेशन मध्ये राहणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी…

सावंतवाडी ता .०५:
शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे होणारी गर्दी रोखण्यासाठी सकाळी सात ते अकरा या वेळेत गांधी चौक ते भवानी चौक या मार्गावरील गाड्या रोखा,अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सुरेद्र बांदेकर यांनी केली आहे.दरम्यान संस्थात्मक विलगीकरणाचे आदेश असताना सुध्दा शहरातील काही लोक होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत.त्याच बरोबर बाधीत कुंटूबातील व्यक्ती उघड पणे फीरत आहेत.त्यामुळे संक्रमण होण्याची भिती अधिक आहे.त्यांना रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा,तसेच मच्छीमार्केट मधील महीलांना योग्य नियोजन व सुविधा उपलब्ध करुन दिल्या असताना सुध्दा काही महीला जागेच्या बाहेर अतिक्रमक करीत आहे.त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा,अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले.

0

4