महाराष्ट्राचे “फुफ्फुस”असलेला सिंधुदुर्ग कोरोना मुक्त करा…

2

पोपटराव पवार;पक्षभेद विसरून कोरोना काळात काम करण्याचे सरपंचांना आवाहन…

कणकवली,ता.०५: सिंधुदुर्ग जिल्हा हे राज्याचे “फुफ्फुस” आहे.त्यामुळे या जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व सरपंचांनी मिळून प्रयत्न करा,आणि त्यात यशस्वी व्हा,असे भावनिक आवाहन हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार यांनी आज येथे केले.
दरम्यान आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सकारात्मक विचारांची आणि निस्वार्थी कार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी पुढे यावे,त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य शासनाकडून नियमित होत राहील असेही त्यांनी सांगितले.श्री पवार यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांची झूम ॲपच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना राबविण्यात यावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित सरपंचांनी विविध प्रश्न श्री पवार यांना केले. त्यांनी अत्यंत सहजतेने त्या प्रश्नांना उत्तरे दिली.जिल्हा पूर्ण मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.असा मूलमंत्र त्यांनी यावेळी दिला.

32

4