आरोसमध्ये पहिल्या डोसला नागरिकांचा प्रतिसाद…

2

बांदा
कोरोना आता ग्रामीण भागातही कहर करत आहे. गावागावांत ‘डोअर टू डोअर’ टेस्टिंग सुरू आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लस घेणे गरजेचे असल्याचे आवाहन, आरोस सरपंच शंकर नाईक यांनी केले.
आरोस ग्रामपंचायत व उपकेंद्र यांच्या माध्यमातून कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच शंकर नाईक बोलत होते. उपसरपंच सरिता नाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक संतोष जाधव, तलाठी गावडे, पोलीस पाटील महेश आरोसकर, आरोग्यसेवक राठोड, आरोग्य सेविका सौ. लळीत, आशाताई संजना कोरगावकर, अंगणवाडी सेविका नीता नाईक, प्राची मेस्त्री, ग्रा. पं. कर्मचारी गुरु आरोसकर, गोपाळ नाईक, देऊ परब, कृती समिती सदस्य राजन नाईक, प्रसाद नाईक, सतीश नाईक, प्राणेश नाईक आदी उपस्थित होते.
आरोस उपकेंद्रात 45 वर्षावरील नागरिकांना 110 डोस देण्यात आले. सुमारे तीन तासांतच डोस संपल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. गावातील ज्या नागरिकांना डोस मिळाला नाही त्यांनाही लवकरच पहिला डोस देण्यात येणार असल्याचे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले.

0

4