मराठा समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी ६ जून पासून आंदोलन…

2

छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा; रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न…

रायगड,ता.०६: मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यासाठी १६ जून पासून राज्यभरात आंदोलन करण्यात येईल,याची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावरून करण्यात येईल,या आंदोलनात सर्व मराठ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी आज केले.
रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात याप्रसंगी त्यांनी उपस्थित मराठा समाजाला आवाहन केले.मराठा सामाजिक मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही,अस सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.त्याचं सर्वांना दुःख झाले आहे. त्यामुळे आता कोण चुकले हे शोधणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले. काही झाले तरी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे.ते आरक्षणापासून वंचित राहता कमा नये,यासाठी आपली पुढील लढाई आहे,त्यासाठी प्रसंगी आंदोलनाची आमची तयारी आहे. आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

1

4