सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०६: आंब्यांच्या पानांची आणि फुलांची तोरणे..सुबक नक्षीदार काढलेली रांगोळी…शौर्याची गाथा पोवाडा, राष्ट्रगीत अन गर्जतो महाराष्ट्र माझा..या गिताच्या ऊर्जेमय वातावरणात आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराजगुढीचे पूजन करून उभारण्यात आली.विधिवत गुढीचे तसेच शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपस्थित उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, दिपाली पाटील, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह विविध खाते प्रमुखांनी पुष्प वाहून महाराजांच्या जयघोषात हा दिन साजरा केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा जयघोषांनी वातावरण भारून गेले होते.

1

4