सुभाष देसाई यांच्या माध्यमातून वैभववाडीत १० ऑक्सिजन मशीन उपलब्ध….

2

वैभववाडी,ता.०६: राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून आणि नाधवडे गावचे सुपुत्र रमेश इस्वलकर, अभिनंदन यादव यांच्या प्रयत्नातून वैभववाडी तालुक्यासाठी १० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत.
वैभववाडी तहसिलदार रामदास झळके यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, नाधवडे गावच्या सरपंच सौं. आदिती नारकर, महेश गोखले, प्रल्हाद कुडतरकर, रोहित पावसकर, श्रीरंग पावसकर, ऋतुजा यादव, लीना पांचाळ,रोहन पावसकर, विशाल पावसकर आदी उपस्थित होते.

1

4