वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला “ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर” भेट…

2

वेंगुर्ले ता.०६: कोरोना महामारीचे वाढते संकट लक्षात घेता सामाजिक बांधिलकी म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयात श्री सातेरी व्यायाम शाळा-वेंगुर्ला व सोनसुरकर फिटनेस-शिरोडा विध्यार्थी मित्र मंडळ यांच्या वतीने आज “ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर” भेट देण्यात आला.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत या साथी चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्या बाबत या लढाई मध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला व सोनसुरकर फिटनेस सेन्टर शिरोडा विध्यार्थी मित्र मंडळ, हितचिंतक, नागरिक यासर्वांच्या सहकार्य मुळे वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे डॉ.अतुल मूळे, डॉ. पंडित डवले यांच्या प्रमुख उपस्तीतीत संचालिका सौ. अबोली किशोर सोनसुरकर, डॉ.आझाद, सिस्टर स्वेता मांजरेकर, सिस्टर सुखदा गावडे, सिस्टर,सुनीता कुऱ्हाडे, हेमंत नाईक, श्री किशोर सोनसुरकर, श्री हेमंत चव्हाण, या उपक्रमाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकित किशोर सोनसुरकर आदी मंडळी उपस्तीत होती.
रुग्णालयाला हे अत्यावश्यक उपकरण दिल्या बद्दल डॉ.डवले यांनी आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी मानव वेल्फेअर सोशल फाउंडेशन कोल्हापूर चे प्रमुख श्री विराज नीलकंठ सोनसुरकर, श्री दीपक पाटील, एवोल्युशन जिम कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. सौ अबोली सोनसुरकर यांनी सर्व देणगीदार यांचे आभार व्यक्त केले. भविष्यात सातेरी व्ययाम शाळेच्या वतीने असेच समाज उपयोगी उपक्रम राबविले जातील त्यासाठी सर्वांचे असेच सहकार्य असावे असे मत व्यक्त केले.

10

4