सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा आमदार केसरकर यांनी घेतला आढावा…

2

सावंतवाडी,ता.०६: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयाची आमदार दीपक केसरकर यांनी आज पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याशी ऑक्सिजन आणि औषध साठया संदर्भात त्यांनी चर्चा केली.

दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाला आता नवीन रुग्णवाहिका मिळाल्यामुळे रुग्णांचे प्रश्न सुटतील, असा विश्वास श्री केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक दळवी आदी उपस्थित होते.

4

4