दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील दोघे ताब्यात…

2

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त…

बांदा,ता.०६: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने आज सावंतवाडी शहरातील दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून २ लाख ४९ हजार रुपयांच्या दारूसह साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
तुषार विनायक तुळसकर वय २३ रा.खासकीलवाडा गावडेशेत व यशवंत चंद्रकांत कार्वेकर वय २३ रा. हरीजनवाडा कारीवडे अशी त्या दोघांची नावे आहेत.
ही कारवाई आज पहाटे साडेचार वाजता बांदा-ओटवणे रस्त्यावर करण्यात आली. यासाठी तब्बल सहा किलोमीटर संबंधित पथकाने या दोघांचा पाठलाग केला.

हि कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गचे अधीक्षक बी.एच. तडवी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस एस साळवे,दुय्यय निरीक्षक जितेंद्र पवार,कुमार कोळी,सुहास वरुटे, जवान सर्वश्री गुरव, अमर पाटील,विशाल भोई,रवींद्र सोनवणे, शिवाजी जाधव यांनी केली. अधिक तपास दुय्यय निरीक्षक जितेंद्र पवार करीत आहेत.दोन्ही संशयितांना न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली.

12

4