पणदूर-घोडगे मार्गावर बोलेरोला अपघात; दोन महिला जखमी…

2

कुडाळ ता.०६: पणदूर-घोडगे मार्गावर बोलेरोवरील ताबा सुटून घडलेल्या अपघातात दोन महिला जखमी झाल्या.ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चोरगेवाडी धरणाजवळ घडली.दरम्यान जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,अपघातग्रस्त बोलेरो भडगाव येथून गोव्याला जात होता.त्यातून ओरोस व भडगाव येथील काही कामगार प्रवास करत होते.दरम्यान अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरोला अपघात घडला.यात बोलेरोचे मोठे नुकसान झाले आहे.

6

4