जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

2

वैभववाडी,ता.०६: ५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’ च्या निमित्ताने ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’, निसर्ग मित्रपरिवार व ग्रामपंचायत तळेरे आणि परिक्षेत्र सामाजिक वनीकरण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.देव गांगेश्वर मंदिर तळेरे येथील देवराईमध्ये बेल, रुद्राक्ष, कदंब, तामन, बहावा, गुलमोहर, पिंपळ, जांभूळ, काजू, सोनचाफा व रातांबा अशा ५५ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचे सचिव प्रा.एस.एन.पाटील, निसर्ग मित्रपरिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर. माजी सभापती दिलीप तळेकर, सामाजिक वनीकरणचे श्री.तळेकर, संदेश तुळसणकर, श्रेयांक पाटील, ग्रामपंचायत सदस्य, व्ही.व्ही. दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक, ग्रामस्थ व निसर्गप्रेमी उपस्थित होते.
शनिवार दिनांक ५ जून रोजी माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आणि निसर्ग मित्रपरिवार, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे येथील गांगेश्वर मंदिर देवराईमध्ये सकाळी ठीक ११ वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. तसेच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका’ या विषयावर मा. सुभाष पुराणिक, पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी यांचे रात्री ठीक आठ ते नऊ या वेळेत गूगल मिट ॲपवर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंक वरून जॉईन होता येईल. अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर (9168341644) व सचिव प्रा.एस.एन. पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

7

4