पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा; सुभाष पुराणिक…

2

वैभववाडी,ता.०६:  मानवाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे असून पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनात प्रत्येक व्यक्तीने खारीचा वाटा उचलायला हवा असे आवाहन पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांनी केले.
माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक संस्थेच्यावतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात केले.
पर्यावरण संवर्धनाचे काम शासनाच्या वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत केले जाते. पर्यावरण संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांचे पालन केल्यास पर्यावरण संवर्धनास मदत होईल अशी पुराणिक यांनी सांगितले.
यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ गिर्यारोहक मा.उमेश झिरपे यांनी माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच शिखर संस्थेकडून योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांना पुराणिक यांनी उत्तरे दिली. या ऑनलाईन व्याख्यानाला संस्थेचे पदाधिकारी, निसर्गप्रेमी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रा.एस.एन.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाऊ नारकर यांनी केले.

11

4