तुळसचा जैतिर उत्सव यावर्षी कोरोनामुळे साधेपणाने होणार साजरा

2

देवस्थानचे मानकरी व देवस्थान समितीच्या संयुक्त बैठकीत निर्णय

वेंगुर्ले,ता.०६: 
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावची ग्रामदेवता श्री.देव जैतीराचा यावर्षी १० जून रोजी होणारा जैतिर उत्सव साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने फक्त मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्या जिल्ह्याची रेड़ झोनकडून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरु असली तरी वेंगुर्ले तालुुक्यातील ग्रामिण भागातील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. तूळस देवस्थानचे मानकरी व देवस्थान समिती यांची संयुक्त बैठक काल पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शासनाच्या व प्रशासनाच्या नियम व अटींना अधिन राहून अत्यंत साध्या पद्धतीने फक्त धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गतवर्षी याच धर्तीवर धार्मिक विधी पार पडले होते. त्यामुळे बाहेरील व गावातीलही भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. यावर्षीही भाविकांनी जेथे आहात तिथूनच हात जोडून देवाचे स्मरण करावे व मानकरी व देवस्थान समितीस सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.

12

4