सावंतवाडी मेडिकल असोसिएशनकडून पालिकेला कोविड संरक्षक साहीत्य…

2

सावंतवाडी,ता.०६: येथील मेडिकल असोसिएशन कडून सावंतवाडी नगरपालिकेला कोविड सेंटर उभारण्यासाठी आवश्यक असलेली संरक्षक सामुग्री देण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश नवांगुळ यांच्या हस्ते मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या कडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.

सावंतवाडी मेडिकल असोसिएशन ने १०० पीपीई किट, २० लिटर सॅनिटायझर, १०० एन९५ मास्क, ८ फेस शिल्ड, ४ कडैवर आवारण पिशव्या, ४ स्प्रेएर आणि सर्जिकल ग्लोव्हज इ.साहित्य आज पालिकेचे मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांच्या सुपूर्द केले.या प्रसंगी सावंतवाडी मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ राजेश नवांगुळ यांच्या सह,डॉ मिलिंद खानोलकर, डॉ कश्यप देशपांडे, डॉ संजय दळवी आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. या साहित्याच्या उपलब्धतेसाठी डॉ मिलिंद खानोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सावंतवाडी मेडिकल असोसिएशन च्या या मदतीसाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी आभार व्यक्त केले.

2

4