सावंतवाडीत मास्क न वापरणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५ जणांना दणका…

2

पोलिसांची कारवाई; विनाकारण फिरणाऱ्यांचाही समावेश, साडेनऊ हजारांचा दंड वसूल…

सावंतवाडी ता.०६: शहरात
विनाकारण फिरणाऱ्यांसह मास्क न लावणाऱ्यांवर व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४५ जणांना पोलिसांनी आज दणका दिला.यात तब्बल ९ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई वाहतूक पोलीस प्रवीण साबळे व सखाराम भोई यांच्या पथकाने केली.
यात मास्क न वापरणाऱ्यांमध्ये ३१ जणांचा समावेश आहे .त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे सहा हजार रुपयांचा दंड घेण्यात आला आहे.तर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांवर कारवाई करण्यात आली.यात त्यांच्याकडून ३ हजार १०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

1

4