बांदा येथील परप्रांतीयांचा “तो” खून नाजूक प्रकरणातून…

2

धागे-दोरे हाती ; लवकरच संशयिताला गजाआड करू, पोलिसांचा इशारा…

बांदा,ता.०६:
बांदा-गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगार विश्वजित मंडल याच्या खुन प्रकरण वेगळे वळण मिळाले असून नाजूक प्रकरणातून खुन झाल्याची शक्यता पोलिसांना वर्तविली आहे. मयतच्या पत्नीची सायंकाळी उशीरापर्यंत पोलिस चौकशी सुरू होती. यामधून काही धागेदोरे पोलिसांना मिळाले असून लवकरच संशयिताला गजाआड करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
विश्वजित मंडल याचा काल मध्यरात्री गडगेवाडी भाड्याच्या खोलीत येथे छाती व मानेवर तीक्ष्ण शस्त्राचे घाव करत निर्घृण खून करण्यात आला होता. घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांनी विविध शक्यता तपासून बघितल्या होत्या. अंतर्गत वादातून किंवा नाजूक प्रकरणातून खुन झाल्याचा प्राथमिक संशय बांदा पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार रात्री उशिरा बांदा पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज मयताची पत्नी व दोन्ही लहान मुलांकडे दिवसभर पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार लवकरच संशयिताच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे मयताच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे नाजूक प्रकरणातून खून झाल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. लवकरच संशयिताला गजाआड करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र तपासाबाबत व मयताच्या पत्नीच्या जबाबाबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

8

4