दोडामार्ग येथील भास्कर सुतार यांच्या कुटुंबियांना दशावतार समितीकडून आर्थिक मदत…

2

दोडामार्ग,ता.०६: येथील दशावतार कलाकार कै.भास्कर सुतार यांच्या कुंटूंबियांना दशावतार कलाकार समिती दोडामार्ग यांच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली.समितीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले.त्यांना आर्थिक सहकार्य करण्यात आले.

यावेळी समितीचे अध्यक्ष सुभाष लोंढे, सचिव शंकर जाधव, खजिनदार राजेंद्र बांदेकर, सहखजिनदार फटी गवस,नाईक दशावतार मंडळ झरेबांबर या मंडळाचे संचालक सागर नाईक, सिंद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ खोक्रल या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वर्णेकर, शारदा संगीत विध्यालय साटेली अध्यक्ष महादेव सुतार, तसेच समितीचे सदस्य रत्नाकर गवस, संजय ठाकूर, कृष्णा कुंभार, प्रेमानंद ठाकूर, यशवंत परीट, समीर (बंटी) सावंत, सुभाष गवस, प्रभाकर गवस आदी उपस्थित होते.

8

4