हेत हायस्कूल येथे कोविड केअर सेंटर सुरु… 

2

वैभववाडी,ता.०६:ग्रामपंचायत हेत यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल हेत येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.१२ बेडच्या या सेंटरला कोविड १९ आरोग्य मंदिर असे नाव देण्यात आले आहे.

कोविड सेंटरमध्ये महीला व पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.दाखल रुग्णांना चहा नास्टा, फळे, दुध देण्याची तरतूद लोकसहभागातून करण्यात आली आहे.कोविड रुग्णांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन संच बसविण्यात आला आहे.
यासाठी सरपंच किशोर कांबळे यांनी खबरदारी म्हणून गावात सार्वजनिक ठिकाणी सॕनिटायझर वाटप करण्यात आले आहे.तर गावातील १००% लोकांचे लसिकरण व्हावे यासाठी नियोजन सुरु आहे.गरज भासली तर चार दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हेत गाव कोरोनामूक्त ठेवण्यासाठी ग्राम सनियंञण समिती व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून प्रयत्न करणार आहोत.अशी माहीती सरपंच किशोर कांबळे यांनी दिली आहे.

 

5

4