वेत्ये येथे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला वृद्धाचा मृतदेह…

2

सावंतवाडी ता.०७:  वेत्ये येथील एका वृद्धाचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.ही घटना आज सकाळच्या सुमारास तेथीलच रस्तावाडा परिसरात उघडकीस आली.दरम्यान सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.याबाबतची माहिती ठाणे अंमलदार श्री.तेली यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की,लक्ष्मण विष्णू जोशी(५६), रा.वेत्ये,असे संबंधिताचे नाव आहे.त्यांच्या घराशेजारीच हा मृतदेह आढळून आला आहे.मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

2

4