कणकवली मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवणार…

2

आमदार नीतेश राणे यांची ग्वाही ; तीन लाखाचे विमा संरक्षण…

कणकवली, ता.७ : मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलंय. त्या सर्वांचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवणार असल्याची ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी आज दिली. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.
राणे म्हणाले, हा विमा तीन लाखाचा असणार आहे तसेच कालावधी एक वर्षासाठी असणार आहे. या विम्याला तीन लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे, त्याचबरोबर ज्या सरपंचांचा ३ लाखाचा खर्च झाला असेल तर त्यांना आणखी ७५ हजार रुपये वाढवून मिळणार आहे. कोरोना काळात सरपंच मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सरपंचांचा मृत्यूही झाला आहे. परंतु शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र लोकप्रतिनिधी या नात्याने मी सरपंचांची जबाबदारी घेत असून पक्षभेद न पाहता सर्वच सरपंचांचा विमा ती उतरवणार आहे अशी ग्वाही श्री.राणे यांनी दिली.

0

4