वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची सावंतवाडीत निदर्शने…

2

सावंतवाडी,ता.०७: पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी गांधी चौक येथे या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी पार नेणाऱ्या मोदी सरकारचा निषेध तालुका कॉग्रेसचावतीन करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू मसुरकर,सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ ,सच्चिदानंद बुगडे,शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर,आनंद परुळेकर, विभावरी सुकी, माया चिटणीस, विल्यम साल्डना,उमेश मोरिये, राकेश चितारी, जास्मिन लक्ष्मेश्वर आदी उपस्थित होते.

8

4