अखेर ‘त्या’ प्रशालेने वह्या विक्रीचा कार्यक्रम पुढे ढकलला…

2

ब्रेकिंग मालवणीचा इम्पॅक्ट…

मालवण, ता. ०७ : टाळेबंदीतही सावंतवाडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सर्व नियम तोडून मागील दाराने वह्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत ब्रेकिंग मालवणीने केलेल्या वृत्तानंतर ‘त्या’ प्रशालेने वह्या विक्रीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असताना सावंतवाडी येथील एका प्रशालेने वह्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची तक्रार व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबतचे वृत्त ब्रेकिंग मालवणीने देताच ‘त्या’ प्रशालेने वह्या विक्रीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

3

4