पायात बूट घालून शिवस्वराज्य दिन साजरा करणाऱ्यांवर कारवाई करा…

2

हुमरमळा सरपंच, ग्रामसेवकाविरूध्द मराठा समाज आक्रमक ; आंदोलनाचा इशारा…

कुडाळ ता .०७: शासनाने जाहीर केलेल्या शिवस्वराज्य दिनादिवशी पायात बूट घालून शिवस्वराज्य गुढीची विटंबना करणाऱ्या हुमरमळा ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना बंगे,अतुल बंगे आणि ग्रामसेवक अपर्णा पाटील यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी सकल मराठा समाज यांच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.याबाबत आज त्यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान संबंधितांवर दोन दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आला आहे.

13

4