खनिकर्म निधीतून बांदा ग्रामपंचायतीला सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान…

2

श्वेता कोरगावकर यांच्याहस्ते उद्घाटन ; सरपंचांनी मानले जिल्हा परिषदेचे आभार…

सिंधुदुर्गनगरी,ता.०७: बांदा ग्रामपंचायतीला आज सुसज्ज अशी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली.जिल्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उन्नती धुरी, सभापती शर्वाणी गावकर, महेंद्र चव्हाण, राजन म्हापसेकर, रणजित देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान ही रुग्णवाहिका प्राप्त झाल्यामुळे त्याचा फायदा शहरातील लोकांना होणार आहे,असे सरपंच विक्रम खान यांनी सांगितले.आपल्या शहराला सुसज्ज रुग्णवाहिका देणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचे त्यांनी आभार मानले आहेत.

2

4