निवृत्त पोलीस कर्मचारी सीताराम पडवळ यांचे निधन…

2

सावंतवाडी,ता.१६: शिरोडा नाका येथील रहिवासी निवृत्त पोलीस कर्मचारी सीताराम पडवळ (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुलगे,एक मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे.

त्यांनी एसआरपी- २ ग्रुपमध्ये २० वर्ष पुण्यात सेवा बजावली. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस बदली त्यानंतर प्रथम रत्नागिरी येथे काम केले होते.१९८३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हात बदली होऊन त्यांनी सावंतवाडीत पोलिसात २० वर्ष काम केले होते.

0

4