उभादांडा समुद्र किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेल्या २ ऑलिव्ह रिडले कासवांना जीवदान…

2

वेंगुर्ले ता.१६: तालुक्यातील उभादांडा, मुठवाडी येथील समुद्र किनारी मंगळवारी संध्याकाळी ६:६० च्या सुमारास खराब झालेल्या जाळ्यात दोन ऑलिव्ह रिडले जातीची कासव अडकले असल्याचे दिसून आले. तेथील युवा मच्छीमार हनुमंत आरावंदेकर, हर्षद तांडेल, संतोष तांडेल, रूपेश आरावंदेकर, संदीप गिरप, राजेश गिरप, बंटी केळूसकर यांनी त्या दोन्ही कासवांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुद्धा आपली जीवाची पर्वा न करता अडकलेल्या जाळीतून त्या दोन कासव यांना सुखरूप रित्या बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडून देत कासवांना जीवदान देण्यास यश मिळविले. युवा मच्छीमार यांनी सांगितले की असे प्रकार गेल्या ८ दिवसांत ३ वेळा घडले असून पुन्हा कृपा करून समुद्रात खराब जाळी न टाकण्याची विनंती उभादांडा येथील कासवांना जीवदान देणाऱ्या या युवक मच्छीमार बांधवांनी केली आहे.

7

4