सबनीसवाडा येथील खूनातील संशयिताला लवकरच गजाआड करू…

2

पोलिस निरिक्षकांचा विश्वास ; अनैतिक धंदे रोखण्यासाठी सावंतवाडी पोलिस “अलर्ट”…

सावंतवाडी,ता.२६: सबनिसवाडा येथे झालेल्या “त्या” खुनाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे.संबधित खुन्याला आपण लवकरच गजाआड करू,असा विश्वास सावंतवाडीचे पोलिस निरिक्षक सचिन हुंदळेकर यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान शहरात गांजा विक्री करणारे रॅकेट मिळाले आहे.ही दुर्दैवी बाब आहे.त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू,त्यासाठी यंत्रणा “अलर्ट” केली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सबनीसवाडा येथिल रमेश राघो ठाकूर (६५) या निवृत्त एसटी वाहकाचा खून झाला होता.यात नेमका कोण हे शोध घेणे पोलिसांना जड झाले होते.मात्र संबधित खुन्यापर्यत आपण पोहोचलो आहोत.त्याला लवकरच अटक केले जाईल,असे श्री. हुंदळेकर यांनी सांगितले.दरम्यान कुडाळ पोलिसांकडुन गांजा विक्री करणार्‍या युवकांवर सावंतवाडीत कारवाई करण्यात आली होती.याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले,हा प्रकार दुदैवी आहे.त्यामुळे असे अनैतिक प्रकार रोखण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत.अनैतिक धंदे रोखण्यासाठी आमची यंत्रणा अलर्ट आहे,असेही त्यांनी सांगितले.

9

4