मळगाव हायस्कूलमधील दोन विद्यार्थिनींची शिष्यवृत्तीसाठी निवड…

2

सावंतवाडी, ता.२७ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव हायस्कूल मधील दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यामध्ये सुचिता सत्यविजय धुरी आणि सिद्धी नारायण गावडे यांचा समावेश आहे. या विद्यार्थिनींना प्रशालेतील शिक्षिका शैलजा परूळेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

दरम्यान या परीक्षेसाठी मळगाव हायस्कूल मधील नऊ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर यातील दोघांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयामार्फत आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या गुणवत्तेची जोपासना करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १२००० रुपये याप्रमाणे नववी ते बारावी या चार शैक्षणिक वर्षात शासनाकडून ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

यावेळी मुंबई संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, शाळा समिती चेअरमन राजेंद्र परब, शाळा समिती सदस्य मनोहर राऊळ, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक वैजनाथ देवण, पर्यवेक्षिका सौ. सावंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

28

4