शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांना पितृशोक…

2

कणकवली, ता.०४ : तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक भिरवंडे पुनाळवाडी येथील व सध्या कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी दिनकर विष्णू सावंत( वय ८३) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत – पालव यांचे ते वडील होत. शिरवल येथील प्राथमिक शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज कणकवलीतील मराठा मंडळ येथील स्मशानभूमी जवळ सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

112

4